Pune City News
पुणे

अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ‘इडी’चा छापा

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे.

दिनांक १० फेबु. सकाळी साडेआठच्या सुमारास ईडीचं पथक विद्यापीठ रोड वरील  ABIL या कार्यालयात दाखल झालं. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. विदेशी चलन प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारून महत्वाच्या कागदपत्रांची छाननी केली होती.

 

Related posts

वारजेत ४५ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे शरद पवारसाहेबांच्या हस्ते अनावरण

Vishal Khandagale

“विजयस्तंभास अभिवादन” जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Vishal Khandagale

कोरोना : बनावट सॅनिटायझरची विक्री: कारवाईचे; मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

Vishal Khandagale

Leave a Comment