PUNE CITY NEWS :- कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याबरोबरच आपापल्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भविष्यकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने दररोज अचूक माहिती अद्यावत करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना विषाणूबाबत विभागीय आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे पार पडली.
या बैठकीला उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नैना बोंदार्डे, साधना सावरकर, त्रिगुन कुलकर्णी, जयंत पिंपळगावकर, पी.बी.पाटील आदि उपस्थित होते.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शेखर सिंह, मिलींद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, . शिव शंकर, आयुष प्रसाद, अमन मित्तल, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, संतोष पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, डॉ. संजीव ठाकूर, डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ. रामचंद्र हंकारे यांनी संवाद साधला.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, संबंधित यंत्रणेनी आपापल्या जिल्ह्यातील बाधित रुग्ण, सक्रीय रुग्ण, गंभीर रुग्ण, बरे झालेले रुग्ण, कोमोर्बिडिटी रुग्ण, मृत्यू झालेले रुग्ण तसेच शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील खाटा, पीपीई किट, व्हेंटीलेटर, ऑक्सीजनयुक्त खाटांची संख्या इत्यादी नोंदी दैनंदिन अद्यावयत कराव्यात, मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी जे जे शक्य होईल अशा सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केल्या आहेत.

