महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली.
5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं सन 2020-21 या वर्षासाठी देणाऱ्या येणाऱ्या या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केल्याचं कळत आहे.
दरम्यान उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत.
त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत.

