गुन्हे विषयक

शिरूर परिसरातून चार सराईत गुंडांना अटक; चार पिस्तुले हस्तगत

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी डॉ.अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारताच पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसावा. यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार एटीएसच्या पथकाने शिरूर परिसरात गस्त घालत असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीसांच्या मदतीने चार सराईत गुंडांना अटक केली असून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

अशी माहिती दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीणचे ( ATS) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे पथक शिरूर हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाला माहिती मिळाली होती.

त्यानुसार दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने किरण सोनवणे, सुनील सोनवणे, संतोष मंडले( सर्व रा.राळेगण थेरपा ता.पारनेर जि. अहमदनगर )व हर्षराज शिंदे (रा.बाभुळसर ता.शिरूर जि.पुणे) यांना शिरूर येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

या चारही आरोपी वर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या माहिती नुसार या आरोपींवर यापूर्वी खून ,दरोडा खुनाचा प्रयत्न यासारखे इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related posts

कोंढवा पोलिसांकडुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस !

Vishal Khandagale

एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग

Vishal Khandagale

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पुणे पोलीस दलामधील 8 पोलीस निलंबित

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX