पुणेमहाराष्ट्र

एकता कपूरच्या प्रतिमेला मारले जोडे

ट्रीपल एक्स सिझन- 2 वेब सिरीजवर बंदी घालून वेब सीरिजच्या निर्मात्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व सर्व माजी सैनिक संघटनांनी केली आहे.

या वेब सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणार्‍या व लष्कराच्या वर्दीची विटंबना केल्याचा प्रकार वेब सिरीजमध्ये निर्माण केला आहे.

या वेब सीरिजच्या माध्यमांतून समाजात विकृत संदेश पसरविणार्‍या फिल्म निर्माती एकता कपूर व या वेब सिरीजच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

याप्रकरणी गुन्हे दाखल करुन आरोपींवर कारवाई न झाल्यास माजी सैनिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

एकता कपूरने देशाच्या सैनिकांचा अपमान करुन त्यांची थट्टा केली असून फक्त सैनिकच नव्हे तर समाजातील पवित्र नात्यांमध्ये अश्‍लीलता दाखवून एक प्रकारे विकृतीवृत्ती पसरवली आहे.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब देशमाने, मारूती ताकपेरे, रमेश पाचरणे, गोरक्ष काळे, उद्धव थोटे, विनोद परदेशी, बाबासाहेब भोर, जनार्धन जायभाये, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, माधव झिरपे सहभागी झाले होते.

दरम्यान, आजी-माजी सैनिकांच्या भावनेशी खेळणार्‍या या घटनेचा निषेध व्यक्त करुन, माजी सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन केले.

Related posts

सुवर्णयुग सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ११ लाख रुपयांची मदत

Vishal Khandagale

“श्रीं” ची प्राणप्रतिष्ठापणा प्रथमच अध्यक्ष, पदाधिकारी करणार

Vishal Khandagale

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX