Pune City News
पुणे

करधारकांना बँकांचे अर्थ सहाय्य मिळवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे महानगरपालिकेचा थकीत मिळकत कर भरण्यासाठी कर धारकांना बँकांचे अर्थसहाय्य मिळावे, यासाठी मनपाभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहरातील बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली.

करदात्यांना सुलभ हप्त्याने कर भरणा करता यावे असे मत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांसमोर मांडले. बँक अधिकाऱ्यांनी सुद्धा यांस प्राथमिक मान्यता दिली.

अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा करून बँकेच्या नियमाप्रमाणे कर्ज कसे देता येईल, याबाबाबत आखणी करून लवकरच अशी कर्ज योजना अमलात आणून पुणे मनपाच्या कर वसुलीसाठी हातभार लावण्याची तयारी दर्शविली आहे.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, मिळकटकर प्रमुख विलास कानडे, सारस्वत बँक, कॉसमॉस बँक, जनसेवा बँक, जनता बँक, सुवर्णयुग बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts

दौंड येथे नामांकीत फोटोग्राफरचा खून

Vishal Khandagale

राष्ट्रवादी पक्षाची भुमिका व सरकारी योजना सर्वसामान्य जनते पोहचवा- शहराध्यक्ष विजय बापु डाकले

Vishal Khandagale

उंड्री, होलेवस्ती “Micro Containment Zone “पहा!

Vishal Khandagale

Leave a Comment