Pune City News
गुन्हे विषयक

कर्वेनगर परिसरात पत्नीला मारून ज्येष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या !

PUNE CITY NEWS :- पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने पत्नीचा गळा दाबून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश हेमंत गोरे (वय ६९) व वैशाली हेमंत गोरे (दोघे रा. गंगा विष्णु संकुल, कर्वेनगर) अशी या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेष्ठ नागरिक असलेले अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होते. वैशाली गोरे यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. तर अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या मित्रांना आपले गुडघे खुप दुखत असल्याचे भेटल्यावर सांगितले होते.

नातेवाईकांनी त्यांना अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर नातेवाईकांकडून सोमवारी (दि.२७) जुलै रोजी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, त्या दोघांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.

Related posts

पुण्यात पतीपाठोपाठ पत्नीचीही आत्महत्या..

Vishal Khandagale

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

Leave a Comment