चाकण परिसरातील थोपटेवाडी येथे तरुणीची हत्या प्रकरणात नात्यातील एका अल्पवयीन तरुणाने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. तसे आरोपीने कबूल केले आहे.
खेड तालुक्यातील थोपतेवाडी येथे २४ जुलै रोजी आरती सोपान कलवडे या तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह एका झाडीत फेकून देण्यात आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकारणाचा चाकण पोलिसांनी सर्व बाजूनी तपास केला. त्यात कुटुंबातीलही काही लोकांची चौकशी करण्यात आली. त्यात नात्यातील एका अल्पवयीन तरुणाने एकतर्फी प्रेमातून ही हत्या केल्याचे सांगितले. तरूणीने त्याला अनेकदा नकार दिला होता. त्याचा राग या तरुणाच्या मनात होता. म्हणून हत्या केल्याचे त्या तरुणाने सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी सांगितले.

