Pune City News
राष्ट्रीय

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मुंबई, दिल्लीसह १४ मालमत्तांवर सीबीआयच्या धाडी

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १५ पेक्षा अधिक मालमत्तांवर सीबीआयने आज छापेमारी केली.

शिवकुमार यांच्यावर केलेल्या एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली.

शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयने छापे मारले. यात बंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांच्या घरांचीही सीबीआयकडून झाडाझडती घेतली.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप शिवकुमार यांच्यावर ठेवला आहे.

१४ ठिकाणी धाडी : याप्रकरणी सीबीआयने कर्नाटकातील नऊ, दिल्लीतील चार आणि मुंबईतील एक अशा शिवकुमार यांच्या १४ ठिकाणांवर आज धाडी टाकल्या.

Related posts

आधार अपडेट करणे झाले खर्चिक

Vishal Khandagale

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

‘फोर्ब्स’ची 100’ श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे ‘हे’ टॉप टेनमध्ये

Vishal Khandagale

Leave a Comment