Pune City News
गुन्हे विषयक

शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

PUNE CITY NEWS :- पुण्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र समोर आले असून पुण्यामध्ये शेजारांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत शेजारच्या महिलांनी या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने ही महिला मानसिक तणावाखाली होती. आणि त्यातूनच या महिलेने हे पाउल उचलल्याची माहिती समोर येत आहे.

वैशाली राउळ (३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दीपा युवराज दळवी आणि शिवानी चव्हाण ( रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैशाली यांचे पती विजय राऊळ (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैशाली आणि त्यांचे पती काही महिन्यांपासून आंबेगाव खुर्द परिसरातील शनिनगरमधील एका इमारतीत राहतात.

त्यांच्या शेजारी राहत असलेल्या दीपा आणि शिवानी यांनी वैशाली यांच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेत होत्या. त्यातूनच त्यांच्यात अनेकदा भांडण देखील झाले होते.

त्या कारणामुळे वैशाली या मानिसक तणावाखाली होत्या. या तणावातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली.

याबाबत विजय यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts

होमिओपॅथिक क्लिनिकला पुणे महानगरपालिकेचा दणका

Vishal Khandagale

राज्यातील पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Vishal Khandagale

धावत्या वाहनात महिलेवर अत्याचार!

Vishal Khandagale

Leave a Comment