महाराष्ट्र

कोरोना : कुलगुरू आयसोलेशन वार्डमध्ये !

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता यांना अक्षरश: डिटेंड करून आयसोलेशन वार्डमध्ये ठेवावे लागले.
हे दोघे अमेरिकेतून एका परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी परतले होते. कॉन्फरन्स अटेंड करून परवा भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते. असे असूनही या दोघांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते राहुरी असा बिनदिक्कत भेटीगाठी घेत प्रवास केला. एव्हढेच नव्हे तर या दरम्यान विद्यापीठाच्या काही केंद्रावर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल सत्कारही स्वीकारल्याचे समजते.
हे दोघेजण ज्या विमानाने दिल्लीपर्यंत आले त्या विमानांमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे, त्यामुळे काळजी वाढली आहे.एअरपोर्ट ओथॅंरीटीकडून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या दोघांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री पाठवण्यात आली. कुलगुरू महोदय दोन दिवस सर्व विद्यापीठांच्या कर्मचारी विद्यार्थ्यांकडून ‘अमेरिका रिटर्न’ झाल्याबद्दल सत्कार स्वीकारण्यात दंग होते. या गडबडीत सर्व सहयोगी अधिष्ठाता यांची बैठक देखील पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार स्वतः जिल्हाधिकारी कुलगुरूंशी बोलले आणि सेल्फ क्वारंटाईन होण्याची विनंती केली. त्यावर कुलगुरूंची उत्तर होते..”मला काही झाले नाही आणि होणारही नाही”.अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तहसीलदारांना आदेश दिला. कुलगुरू आणि डीन यांना डिटेंड करून आता राहुरीच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

Related posts

महाराष्ट्रातील दिल्लीत अडकलेले यूपीएससीचे 325 विद्यार्थी पुण्यात पोहोचले,

Vishal Khandagale

राज्यातील बँका 10 ते 2 सुरू राहणार !

Vishal Khandagale

‘जनता कर्फ्यू’ कोण बाहेर येऊ शकते, कोण नाही !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.