Pune City News
महाराष्ट्र

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १२ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले आहे. हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरिता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.  युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Related posts

राज्यातल्या डॉक्टर्स च्या सुट्टया रद्द

Vishal Khandagale

राज्यपालांकडून राज्य सरकारचे कौतुक

Vishal Khandagale

या मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा !

Vishal Khandagale

Leave a Comment