जगभरात कोरोना विषाणु चा कहर सुरू असून भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या 8 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.
याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मज्जीत, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
देशभरात शुक्रवारी तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 हून अधिक आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

