राष्ट्रीय

कोरोना : जागतिक बँकेकडून “भारताला” निधी मंजूर!

Pune City News :- जागतिक बँकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेऊन भारताला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

★ निधी मंजूर : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला 7 हजार 500 कोटींचा (100 कोटी डॉलर) आप्तकालीन निधी देण्यास मंजूरी दिली आहे.
★ सर्वाधिक निधी : ‘जागतिक बँकेतर्फे मदतनिधी म्हणून पहिला टप्पा 1.9 अरब डॉलरचा निधी देण्यास सुरुवात झाली आहे. हा निधी 25 देशांना देणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या निधीपैकी सर्वाधिक निधी भारताला दिला आहे.

★ जागतिक बँकेने म्हटले की : भारतामधील आरोग्य यंत्रणेने योग्य पद्धतीने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष निधी देण्यात आला आहे. हा निधी वापरुन आरोग्य सेवा अधिक सक्षम करुन त्या माध्यमातून देशावर आलेल्या संकटाशी सामना करणे शक्य होणार आहे.
पाकिस्तानला 20 कोटी डॉलर आणि अफगाणिस्तानला 10 कोटी डॉलरची मदत जागतिक बँकेने जाहीर केली आहे.

Related posts

जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक इशारा!

Vishal Khandagale

सहा दिवसांत पेट्रोल ‘एवढे’ महागले !

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सकाळी 9 वाजता ‘स्पेशल मेसेज’

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX