Pune City News:- शुक्रवारी सकाळी म्हणजेच उद्या सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना एक विशेष संदेश देणार आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि देशांमधल्या राज्यांमध्ये करोनाची काय स्थिती आहे ते जाणून घेतले.
आता उद्या सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नवी काही घोषणा होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

