Pune City News
महाराष्ट्र

मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत : मंत्री जितेंद्र आव्हाड

Pune City News :- मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
★ आव्हाड म्हणाले :

▪️ आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील,

▪️ किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत.

▪️ लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती. मात्र टाळी-थाळीनंतर पंतप्रधान आता दिवे लावण्याचा इव्हेंट करत आहेत.

▪️ कोव्हीड 19 शी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. हे पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Related posts

ठाकरे सरकारने चेष्टा लावली…

Vishal Khandagale

14 कोटींचा मास्कसाठा जप्त : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment