Pune City News :- लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, अस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरस नियंत्रण, उपाययोजना आणि लॉकडाऊन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
उद्धव ठाकरे व विभागीय आयुक्त चर्चेतील महत्वाचे विषय :
▪️ आरोग्य व आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे.
▪️ त्यामुळे उद्योग व्यवसाय सुरु करावे लागत आहेत.
▪️ ज्या क्षेत्रात उद्योग व्यवसाय सुरु होत आहेत तिथे काळजी घ्यावी लागेल.
▪️ ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे

