Pune City News
महाराष्ट्र

NCB उपसंचालकांना कोरोना; दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास करणारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला गेले आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करताना बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आली. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहेरे एनसीबीच्या रडारावर आहेत.

एनसीबीच्या टीमने नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि इतर अभिनेत्रींची चौकशी केली होती.

एनसीबीच्या या टीमचे केपीएस मल्होत्रा नेतृत्व करत आहे. शनिवारी रात्री केपीएस मल्होत्रा यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Related posts

कोरोना: जेनिफर…. तुझ्या या धाडसाला जगाचा सलाम !!

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

पंजाब: 167 कोरोना संशयित बेपत्ता

Vishal Khandagale

Leave a Comment