Pune City News
पुणे

कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची सर्वपक्षीय आढावा बैठक पार……

पुणे शहरातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्षनेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत शहरातील संसर्गाची स्थिती, पुणे महापालिका करत असलेल्या उपाययोजना आणि नजिकच्या भविष्यकाळातील नियोजन, यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या सौ. दिपालीताई धुमाळ, काँग्रेसचे गटनेते श्री.आबा बागुल शिवसेनेचे गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते श्री. वसंत मोरे, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल, डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान सर्व प्रकारच्या बेड्सची संख्या वाढविण्यात यावी तसेच कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक ते उपचार मिळावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

Related posts

पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाग्रस्थ

Vishal Khandagale

विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई निलंबित: हप्ता वसुली प्रकरण उजेडात

Vishal Khandagale

पुण्यातील उद्योजका कडून ससूनला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट…!

Vishal Khandagale

Leave a Comment