महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प क्रमांक – १ पुणे या प्रकल्प कार्यालयातील पर्वती दर्शन विभागाच्या अंगणवाडी क्रमांक – ११७ येथील अंगणवाडी सेविका श्रीमती. सविता प्रभाकर शिळीमकर यांचा अंगणवाडी केंद्राशी संबंधित सेवा बजावतांना कोविड – १९ चा संसर्ग झालेल्या लाभार्थ्यांच्या संपर्कात आल्याने कोविड – १९ चा संसर्ग होऊन दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला त्या पार्वश्वभूमीवर प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. सुहिता आनंदा ओव्हाळ , मुख्यसेविका श्रीमती. कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला यांनी पाठपुरावा करीत मा. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना (महाराष्ट्र राज्य) नवी मुंबई यांच्याकडे दिवंगत अंगणवाडी सेविका श्रीमती. सविता प्रभाकर शिळीमकर यांच्या पाल्ल्यांना सानुग्रह साहाय्य निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला होता सदर प्रस्तावास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता देण्यात आल्याने
मा. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना (महाराष्ट्र राज्य) नवी मुंबई यांचे मार्फत १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प क्रमांक – १ पुणे या कार्यालयास सानुग्रह साहाय्य निधी ५० लाख रुपये वितरित करण्यात आला , सदरील सानुग्रह साहाय्य निधी आज दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी अंगणवाडी सेविका श्रीमती. सविता प्रभाकर शिळीमकर यांचे पाल्य कन्या अंकिता व मुलगा आकाश शिळीमकर यांना वितरित करण्यात आला , सानुग्रह साहाय्य निधी ५० लाख रुपये वितरण मा. श्री. राहुल मोरे , आयुक्त , महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य , यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमास मा. श्री. बी. एल. मुंढे , उप आयुक्त (प्रशासन) महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य , मा. श्री. दिलीप हिवराळे , उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य तथा विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे विभाग पुणे , मा. श्रीमती. सुहिता आनंदा ओव्हाळ , बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प क्रमांक – १ पुणे तथा सहाय्यक आयुक्त महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य , मा. श्रीमती. मनिषा बिरारीस सहाय्यक आयुक्त नियोजन तथा कार्यक्रम व्यवस्थापक , बाल संरक्षण कक्ष बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प क्रमांक – १ पुणे या प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .
सदरचा लाभ मिळाल्यानंतर अंगणवाडी सेविका श्रीमती. सविता प्रभाकर शिळीमकर यांचे पाल्य कन्या अंकिता व मुलगा आकाश शिळीमकर यांना अश्रू अनावर झाले त्यांनी सांगितले कि त्यांचे वडिल श्री. प्रभाकर शिळीमकर यांचा २००१ साली अपघाती मृत्यू झाला त्यावेळी आम्ही १ ते ४ वर्षाचे होतो तेव्हापासून आमच्या आईने अंगणवाडी सेविकेचे काम करीत खूपच मेहनतीने आम्हाला वाढवले व शिकविले परंतु आज आई हि गेल्याने आम्हाला खूप दुःख होत आहे , आई गेल्या नंतर आमचा सांभाळ आमचे आजी , आजोबा , मामा करीत आहेत , एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाचे तत्कालीन आयुक्त श्रीमती. इंद्रा मालो , सध्याचे आयुक्त श्रीमती. रुबल अग्रवाल तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. सुहिता आनंदा ओव्हाळ , मुख्यसेविका श्रीमती. कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला , गट समन्वयक श्री. प्रविण पदमसिंग राजपूत , मा. श्री. व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला (मंडल अधिकारी हडपसर , तहसील कार्यालय हवेली) यांनी आमच्या पाठीशी उभे राहण्याच्या दृष्टीने सानुग्रह साहाय्य निधी मिळवून दिल्या बद्दल आम्ही ऋणी आहोत .

