Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना : ४ नवीन रुग्ण आढळले!

Pune City News:- राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या ४ रुग्णांपैकी मुंबई येथील २ तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या करोना बाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यात त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल,

मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्थान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने (पुरुष) इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. तर पुण्यातील २० वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिलीपाईन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आलेला जो २२ वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळला त्याचा २४ वर्षाचा भाऊ आज करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात आज परदेशातून आलेले एकूण २८१ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. आतापर्यंत बाधित भागातून एकुण १५८६ प्रवासी आले आहेत. विलगीकरण कक्षात आज पर्यंत १३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

Related posts

अर्बन गोस्वामी विरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Vishal Khandagale

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा – गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलवरील शेराच बदलला

Vishal Khandagale

Leave a Comment