महाराष्ट्र

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नियमावली

mahalaxami

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील धार्मिक स्थळे अद्यापही बंद ठेवण्यात आले आहे.  मात्र आता धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून सकरात्मक हालचाली सुरु आहे.  कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. अशी असणार नवीन नियमावली

● मंदिर खुले झाले तरी मंदिराच्या चारही दरवाजातून ये-जा राहणार नाही.
● भक्तांसाठी केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल.
● दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल.
● आत प्रवेश करणाऱ्या सर्वांची थर्मल टेस्टिंग होईल.
● मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहित्यावरही निर्बंध असतील.
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना काही काळ गाभाऱ्यात प्रवेश नाही
● भक्तांच्या संख्येवरही मर्यादा असेल.

दरम्यान, देवीचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहातच साजरा होणार आहे. कोणत्याही प्रकारे मंदिरात किंवा मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

Related posts

पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पेटली

Vishal Khandagale

कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना दिलासा !

Vishal Khandagale

पुण्यातील कोरोना टेस्ट किटला ICMR ची मंजुरी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX