Pune City News
कोरोनापुणे

खराडी, चंदननगर व वडगावशेरी स्वयंस्फूर्तीने बंद!

Pune City News:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर खराडी, चंदननगर व वडगावशेरी संपूर्ण भाग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने बंद राहणार
लॉकडाऊन असताना देखील खराडी, चंदननगर व वडगावशेरी परिसरात सर्वत्र भाजी, किराणा माल, बेकरी, चिकन, मटन आदी साहित्य खरेदी करण्यासाठी खराडी, चंदननगर व वडगावशेरी परिसरातील नागरिक वारंवार घराबाहेर रस्त्यावर बाहेर पडत आहेत. चौकाचौकात नागरिक घोळका करून गप्प्पा मारताना दिसून येतात.त्यामुळे सर्वत्र गर्दी होत असून सोशल डिस्टन्स पाळला जात नाही.

या पार्श्वभूमीवर दिनांक 10,11,12 एप्रिल रोजी 100% टक्के स्वयंस्फूर्तीने सर्व किरणा मालाची दुकाने, चिकन, मटन, भाजीपाला गाड्या व दुकाने देखील बंद ठेवणार येणार आहे. सर्व नागरिकांनी व व्यापारी संघटनेने एकत्रित येवून हा निर्णय घेतला आहे.
पुण्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, आहे. तरी खराडी, चंदननगर व वडगावशेरी परिसरात होत असणारी वर्दळ लक्षात घेऊन स्वंयस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.या काळात केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरु रहाणार आहेत.हा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन संपूर्ण खराडी, चंदननगर व वडगावशेरी च्या नागरिकांनी केले आहे.

Related posts

राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे !

Vishal Khandagale

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशिअल ऑडिट होणे आवश्यक; आबा बागुल

Vishal Khandagale

चिमुकली ला कोणीतरी झुडपात टाकले…..

Vishal Khandagale

Leave a Comment