Pune City News
आरोग्यपुणेपुणे शहरहडपसर

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात संतापातून तोडफोड !

पुणे | प्रतिनिधी हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयाची तोडफोड केली. मृत व्यक्ती हे शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांचे वडील असल्याची माहिती आहे.

अजय सपकाळ यांच्या वडिलांवर अल्सरचे ऑपरेशन होणार होते. ही केवळ दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ऑपरेशनदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा, स्टीलचे डबे व लोखंडी वस्तूंनी फोडून मोठी तोडफोड केली. परिसरात काचांचा खच पडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. माध्यमांशी बोलताना अजय सपकाळ म्हणाले,

> “मी स्वतः शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहरप्रमुख आहे. माझ्याच बाबतीत असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? हे हॉस्पिटल थर्डक्लास आहे. सह्याद्री रुग्णालयावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ही आमची थेट मागणी आहे.”

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

Related posts

वायसीएम रुग्णालयात २० केएल ऑक्सिजन टँकला मंजुरी

Vishal Khandagale

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवडच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

Vishal Khandagale

Leave a Comment