पुणे

मांजरी बु. रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न लागणार मार्गी-आमदार चेतन तुपे

हडपसर येथील मांजरी रस्त्यावरील मांजरी बुद्रुक वरील उड्डाणपुलाच्या कामाची चेतन तुपे सह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत असे लक्षात आले की, या पुलाचे काम सुरुवातीपासूनच नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस लोकवस्ती असल्याने या रस्त्यावर कायम वर्दळ असते. उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने नागरिकांना रहदारीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या संदर्भात आमदार तुपे यांनी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी वाकुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमोद परभणे, चौगुले यांच्यासमवेत उड्डाणपुलाच्या कामाची व सद्यस्थितीत रहदारी असलेल्या रस्त्यांची पाहणी केली.

या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, रस्त्यांची दुरुस्ती वाहतुकीत बदल करणे व इतर उपारेल्वेगेटययोजना करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Related posts

नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी मंडळाची पुणे स्मार्ट सिटीला भेट

Vishal Khandagale

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Vishal Khandagale

केंद्रीय मंत्रालयाचे परिपत्रक पुण्याला लागू नाही !

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX