Pune City News
पुणे

पुण्यातील ‘रेमडीसीविर’चा तुटवडा दूर करा : महापौर मुरलीधर मोहोळ

प्रतिनिधी :- पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.

  •  हा तुटवडा लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
  •  पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी( दि.२) रोजी कोरोना संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
  •  यावेळी महापौरांनी संगीतले की, खाजगी रुग्णालयातून या इंजक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.
  •  या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. याला आळा बसावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मोहोळ यांनी बैठकीत सांगितले.
  •  तसेच सरकारी पातळीवर होणाऱ्या RT-PCR टेस्टची क्षमता वाढवण्यासंदर्भातचा देखील चर्चा करण्यात आली.
  •  या संदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा करत असून अपेक्षा करूयात की यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल.असेही मोहोळ यांनी सांगितले.

Related posts

पुणे छावणी मधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी..

Vishal Khandagale

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

पर्वती “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment