पुणे महानगरपालिकेचा थकीत मिळकत कर वसूल करणेबाबत कायद्यातील सर्व बाबींची पुर्तता करुन तसेच मिळकतकर धारकास सर्वतोपरी संधी देऊनही ज्या मिळकतींचा मिळकत कर वसूल झालेला नाही अशा ९ मिळकतींचा लिलाव करण्यासाठी मा. महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे.
कात्रज येथील मे. नॅन्सी आयकॉन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या मिळकत धारकाच्या एकूण १४० मिळकतींच्या मिळकत करापोटी एकूण देय र.रु. ७,७२,०७,४३४/- महापालिकेस अदा न केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम ४२ ते ४७ नुसार सदर मिळकतधारकांच्या मिळकती महापालिकेने जप्त केलेल्या असून सदर मिळकतींच्या ७/१२ उताऱ्यावर महापालिकेच्या नावे बोजा चढविण्यात आलेला आहे.
सदर जप्त मिळकतींवरील मिळकत कराची वसुली करणेकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील शेड्युल ‘ड‘ मधील प्रकरण ८ (कराधान नियम) चे नियम ४७ नुसार या मिळकतींची ऑनलाईन पध्दतीने प्रथम जाहीर लिलाव मंगळवार दि. ६/४/२०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, रुम नं. २१५, मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे ५ येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत करण्यात येणार आहे .


