Pune City News
पुणे

जम्बो रुग्णालयाची क्षमता लवकरच वाढणार- महापौर मुरलीधर मोहोळ

जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जम्बो कोविड रुग्णालयातील बेडची संख्या व यंत्रणेची क्षमता अधिक वेगाने वाढविण्याबाबत महापौर मोहोळ यांनी सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी ५० आणि शुक्रवारी ५० बेड कार्यान्वित करण्यात येतील, तसेच आयसीयू विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल, असे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

येथे उपचार घेऊन बरे झालेल्या एकूण १७ करोना रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांचे स्वागत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच, उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना रुग्णांशी टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. याद्वारे महापौर व अधिकाऱ्यांनी काही नातेवाईकांसह संबंधित रुग्णांशी व्हिडिओ कॉलनेही संवाद साधला. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता यावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार टॅबची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

Related posts

बिडीचे बदलणार नाव : साबळे आणि वाघिरे कंपनीचा निर्णय

Vishal Khandagale

जम्बो कोविड रुग्णालयाची स्थायी समिती सदस्यांकडून पाहणी

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला

Vishal Khandagale

Leave a Comment