Pune City News
पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयावर ताटली सत्याग्रह आंदोलन

राज्यातील कोविड महासंकटाने असंघटित, कष्टकरी शेतमजुर “हाताला नाही काम ताटात नाही अन्न.जगायचे कसे? हा प्रश्न घेऊन राज्यव्यापी ताटली सत्याग्रहाची सुरूवात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ताटल्या घेऊन करण्यात आले.

यावेळी दगडखान कामगार, शेतमजुर व घरकाम कामगारांनी आज सत्याग्रह आंदोलन केले. प्रत्येक कामगाराला दरमहा किमान ५००० रु. चा निधी त्याच्या खात्यावर जमा करावा. मोफत रेशन धान्याचा पुरवठा करावा.

मोफत भोजन योजना लागू करावी. आरोग्य विमा संरक्षण द्यावे आदी मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना ॲडव्होकेट बी.एम.रेगे व त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यावर चर्चा केली.

प्रशासकीय व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. मागण्या पुर्ण होईपर्यंत सत्याग्रह थांबणार नाही, असा इशारा रेगे यांनी दिला.

आंदोलनात संतुलन कष्टकरी शेतकरी महिला संघटनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेगे सहभागी झाल्या होत्या. सत्याग्रहाचे संयोजन सुरेश पवार, आदिनाथ चादणे ,समाधान आहिरे, जनाबाई चौगले, फुलाबाई थोरात, मयप्पा चौगुले यांनी केले.

Related posts

अंगारक चतुर्थी

Vishal Khandagale

.तरआम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील

Vishal Khandagale

कात्रज परिसरात भीषण वणवा पेटला !

Vishal Khandagale

Leave a Comment