Pune City News
पुणे

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले ‘ते’ फोटो पुण्यातील नाही; महापौरांचे स्पष्टीकरण

PUNE CITY NEWS :- रायगड जिल्ह्यातील महाड येथे पाच मजली इमारती कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र सोशल मीडियावर पुण्यामध्ये मेट्रोचा काम सुरू असलेला पूल कोसळला असल्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ही छायाचित्र पुण्यातील असल्याचेही दावा केला जात आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, असा कुठलाही प्रकार पुण्यात घडलेलाच नाही, असे स्पष्टीकरण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर वरून दिले आहे.

यासंदर्भात मोहोळ यांनी सांगितले की, मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले असून हा प्रकार पुणे शहरातील नाही. आपल्यालाही असे फोटोज आणि मेसेज आले असल्यास आपण फॉरवर्ड करु नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. याबाबत अधिक तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड शहराचा केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात सातवा क्रमांक

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

मा.नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त “अन्न धान्य किटचे” वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment