Pune City News
गुन्हे विषयक

लैंगिक अत्याचार प्रकरणी गावगुंडा विरुद्ध तक्रार करण्यास मदत म्हणून मारहाण !

25 सप्टेंबर 2020 रोजी रात्री साडेअकरा वाजता, खराडी येथील एशियन पेंट शॉप च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये, श्री सचिन गणेश सातव (वय 38 रा. वाघोली) यांना चार ते पाच गुंडांनी अडवून, त्यांच्यावर लोखंडी रॉड सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. हे चार-पाच अनोळखी इसम सचिन सातव यांना मारताना बोलत होते की “मुलीच्या प्रकरणात लई लक्ष घालतो काय? ठोका याला” असे बोलत त्यांनी, सचिन सातव यांना लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली. ह्या मारहाणी मध्ये त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झालेले आहे. मारहाण झाल्यानंतर श्री सचिन गणेश सातव यांच्या त्या इसमांच्या बोलण्यावरून, त्या इसमांनी का मारले हे समजले. व त्यांनी चंदनगर पोलिसांकडे या मारहानी संदर्भात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये त्यांच्या मारहाणीचे कारण स्पष्ट झाले आहे. सचिन सातव यांनी आपल्या शिक्रापूर येथील मित्राला लैंगिक अत्याचार प्रकरणी तक्रार करण्यास मदत केली होती. शिक्रापूर येथील मित्राच्या मुलीवर दीपक ठोंबरे (रा. वाघोली) याने लैंगिक अत्याचार केला होता. त्यावरून शिक्रापूर पोलिसांनी दीपक ठोंबरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. व त्या अनुषंगाने पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी, सचिन सातव यांनी आपल्या मित्राला मदत केली होती.

या मदतीचा राग मनात धरून, गुंड दीपक ठोंबरे याने 25 सप्टेंबरला रात्री सचिन सातव हे घरी जात असताना त्यांना अडवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करवला. सचिन सातव यांच्या हातावर, पायावर, बरगड्यांवर व पायांच्या नडगी वर, दगडाने मारहाण केली. त्यात सचिन सातव गंभीर जखमी झाले. व त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी चंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली व सदर प्रकार सांगितला.

दीपक ठोंबरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव साहेब यासंबंधी अधिक तपास करत आहे.

Related posts

कॅनॉलमध्ये उडी घेऊन रिक्षा चालकाची आत्महत्या

Vishal Khandagale

माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत बांधकाम प्रकल्प “मंत्रा बिल्डर” झाला गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

आलिशान सोसायटीची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षकच निघाला चोर !

Vishal Khandagale

Leave a Comment