गुन्हे विषयक

पोलिसांनी केला ७ किलो गांजा जप्त !

crime

PUNE CITY NEWS :- गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना सात किलो गांजासह येरवडा  पोलिसांनी सापळा रचून अटक केली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ९४
हजार रुपये आहे. याप्रकरणी रवींद्र कोंडीबा राखपसरे (वय ३२) संदीप शंकर डोंगरे (वय २९ दोघेही रा. केसनंद फाटा वाघोली) यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गणेशोत्सवामुळे येरवडा भागात तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे पेट्रोलिंग करत असताना नगर रोड वाडीया बंगला येथे पांढरी स्विफ्ट मोटार उभी होती. या मोटारीजवळ दोघे | संशयित व्यक्ती उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक पिवळ्या रंगाचे पोते होते. त्यांच्या जवळ असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या पोत्यात सात किलो ८०७ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी मोटारीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, सहाय्यक निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस कर्मचारी हनुमंत जाधव, विनायक साळवे, सचिन रणदिवे, संजय सकट, अंकुश निकम, राहुल परदेशी, पंकज मुसळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related posts

चिंचवडमध्ये चार दुकाने फोडली….

Vishal Khandagale

आंदेकर टोळीच्या संघर्षात युवकाचा खून

Vishal Khandagale

बुधवार पेठेत तडीपार गुंडाने केला पोलीस हवालदाराचा खून

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.