राष्ट्रीय

देशातील सर्वात मोठ्या विमानतळासाठी ‘या’ कंपनीशी करार

देशातील सर्वात मोठे विमानतळ उत्तरप्रदेशातील नोईडा विभागात जेवर येथे उभारला जात असून त्याचे कंत्राट स्वित्झर्लंडमधील कंपनीला मिळाले आहे.

  • नोईडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजे नियाल आणि झुरीच कंपनीमध्ये सात ऑक्टोबर रोजी विमानतळ उभारणीचा करार केला जात आहे.
  • २०२३ पासून या विमानतळावरून उड्डाणे सुरु करण्याचे ध्येय निश्चित केले गेले आहे.  या प्रकल्पासाठी झुरीच इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड एजी ने यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड नावाने स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी बनविली आहे.
  • ही कंपनी आणि नियाल यांच्यात आज करारावर सह्या होणार आहेत. कोरोनामुळे झुरीच कंपनीचे प्रतिनिधी भारतात येऊ शकलेले नाहीत. या प्रकल्पासाठी झुरीच कंपनीने प्रती प्रवासी ४००.९५ रुपये महसूल देण्याची तयारी दाखविली आणि ही सर्वाधिक किंमत ठरल्याने या कंपनीला प्रकल्प उभारणीचे काम मिळाले होते.
  • या विमानतळाचा लाभ २२ जिल्ह्यांना होणार असून त्यामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार तयार होणार आहे.

Related posts

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

Vishal Khandagale

मुंबईतून पहिली एक्स्प्रेस रवाना

Vishal Khandagale

पुण्यात कोरोनाचे “5 रूग्ण “

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX