महाराष्ट्रराष्ट्रीय

अखेर रिया जेलच्या बाहेर

ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर केला आहे.

रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती.

मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.

त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

मात्र यावेळी रियाला पासपोर्ट अमलीपदार्थ विरोधी पथकाकडे (एनसीबी) जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Related posts

कोरोना : जनता कर्फ्यूची मागणी ; “पंंतप्रधान नरेंद्र मोदी “

Vishal Khandagale

आधार अपडेट करणे झाले खर्चिक

Vishal Khandagale

पेट्रोलच्या – डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX