Pune City News
पुणे

दौंड येथे नामांकीत फोटोग्राफरचा खून

दौंड शहरातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे उघडकीस आली आहे.

लिंगाळी (ता.दौंड) हद्दीत काळे मळा परिसरातील कॅनलवर हा प्रकार घडला आहे. मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंगाळी हद्दीतील (काळे मळा) येथील कॅनलवर रविवार (दि.४) रोजी एक पुरूष मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती.

पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी दगड, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या.

अज्ञात मारेकऱ्याने केदार भागवत यांच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.

याबाबत अधिक तपास सुरू असून दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाचे आदेश दिले आहेत.

Related posts

पुणे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यात समन्वय नाही : जगदीश मुळीक

Vishal Khandagale

पुणे शहर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कडून अन्न धान्य वाटप!

Vishal Khandagale

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Vishal Khandagale

Leave a Comment