पुणे

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना उत्साहात निरोप

PUNE CITY NEWS :- पुण्याच्या मानाच्या गणपतींचे साधेपणाने व घोषणाबाजी करत विसर्जन करण्यात आले. जगात पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

मानाचा असणारा पहिला कसबा गणपतींचे विसर्जन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आरती करून सकाळी अकरा वाजून ३० मिनिटांनी करण्यात आले. त्यानंतर मानाचा दुसरा असणारा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन कृत्रीम हौदात करण्यात आले.

मानाचा तिसरा असणारा गुरुजी तालीम गणपतीला मोजक्या १२.३० च्या सुमारास गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करत निरोप दिला. मानाचा चौथा असणारा तुळशीबाग गणपतीला दुपारी सव्वा एकाच्या सुमारास निरोप देण्यात आला. आणि मानाचा असणारा पाचवा केसरी वाडा गणपतीला १ वाजून ३५ मिनिटांनी निरोप देण्यात आला. यावेळी गणेशभक्त उपस्थित होते.

यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत प्रत्येक मंडळाने बाप्पाला निरोप दिला.

या मनाच्या गणपती विसर्जनाला महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गणपती विसर्जनाला सुरुवात करण्यात आली.

गणेश मिरवणुकीच्या इतिहासात पुण्यातील कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, रिकामे असल्याचे पाहायला मिळाले.

Related posts

‘डिझेल’ आणखी भडकले

Vishal Khandagale

बांधकाम व्यवसाय स्वयंस्पुर्तीने कामबंद : क्रेडाई पुणे मेट्रो

Vishal Khandagale

पुणे शहरात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त..

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX