Pune City News
पुणे

विमाननगर मध्ये फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा !

PUNE CITY NEWS :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे.  गणेश विसर्जनाच्या काळातील गर्दी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टी  चे नगरसेवक राहुल भंडारे  यांनी विमाननगर मध्ये  फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विमाननगर प्रभाग क्रमांक ३  भागातील नागरिकांना घरातील किंवा सोसायटीतील गणेशमूर्तींचे विसर्जन आता आपल्या परिसरामध्ये करणे शक्य होणार आहे. दरवर्षी येरवडा , खराडी येथील नदीच्या घाटावरती गणेश विसर्जनासाठी हौद उभे केले जातात. त्यात आसपासच्या परिसरातील नागरिक आपल्या गणेशाचे विसर्जन करतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी गणेशाचे घरच्या घरीच विसर्जन करण्याचे ठरवले आहे. तथापि सार्वजनिक हौदावर नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी विमाननगर भागात नगरसेवक राहुल भंडारे यांच्या संकल्पनेतून फिरत्या विसर्जन हौदाच्या उपक्रम राबवला जात आहे.  नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर लगेच नागरिकांच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारामध्ये हा फिरता हौद येणार आहे.

Related posts

जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९३ रुग्ण बाधित..

Vishal Khandagale

दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्चनंतर ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

पुणे शहर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कडून अन्न धान्य वाटप!

Vishal Khandagale

Leave a Comment