Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

पालखी सोहळ्यावर कोरोना चे सावट !

WARRI

Pune City News:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी आहे. त्यामुळे सर्व धार्मिक सण, उत्सव हे यावर्षी साजरे न करण्याचा निर्णयवजा आदेश प्रशासनाने दिला आहे.कोरोना चे सावट आता विठुरायाच्या यंदाच्या आषाढी वारी, पालखी सोहळ्यावरही पडणार आहे.
यंदा प्रथा,परंपरेचा भाग जपत पालखी सोहळा केला जाणार असून या सोहळय़ाचे स्वरूप आणि दक्षतेबाबत लवकरच प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी सांगितले.या सोहळय़ात मर्यादित लोकांचा सहभाग रहाणार असून ‘सामाजिक अंतर’ठेवत पालखी नेणे,मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
तसेच वैद्यकीय पथक ठेवणे, पुणे शहरातून हा सोहळा न जाता तो शहरा बाहेरून नेण्याच्या मार्गाचे नियोजन करणे आदी गँष्टींचा अवलंब केला जाणार आहे.आषाढी यात्रा आणि पालखी सोहळय़ाच्या आयोजना बाबत या सोहळ्यातील प्रमुखांची बुधवारी वीडियो कॉफ्रँस द्वारे एक बैठक पार पडली.वारीची परंपरा खंडित न होता ती राखली जावी म्हणून यंदा तिचे स्वरूप बदलण्याचे या बैठकीत ठरले. याबाबत प्रशासनाशी चर्चा करत याला अंतिम रूप देण्यात येईल,असे वासकर महाराज यांनी सांगितले.
तत्पूर्वी मानाच्या सर्व पालखी सोहळा आयोजकांकडूनही सूचना मागवण्यात येणार असून हा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीचीही स्थापना केली जाईल.

Related posts

पिंपरी-चिंचवड शहरात पाच संशयित

Vishal Khandagale

पुण्यातील महंमदवाडी परिसरात दहा गायींची कत्तल

Vishal Khandagale

शाळांची कोरोना काळातील फी भरावीच लागणार!- सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

Leave a Comment