Uncategorizedपिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना मिळणार डिजिटल पास !

Pune City News:- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील नागरिकांना शहरात प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी पालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या मोबाईल अप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे डिजिटल पास फक्त पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. ही सुविधा सोमवार (दि.11 मे) पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारची शासकीय, खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर बंधने आलेली आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Related posts

कोरोना : पुणे जिल्ह्यांत “बार व परमिट रुम बंद”

Vishal Khandagale

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा; पवार

Vishal Khandagale

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX