PUNE CITY NEWS :- पुण्यात शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाग क्र १३ मध्ये भाजपच्या वतीने
त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचेनप्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर उपस्थित होते.
शहीद मेजर ताथवडे यांचे शौर्य अतुलनीय असून मला जेव्हा विचारले जाते की तुमचे कोणते स्वप्न अपूर्ण राहिले आहे का तेव्हा मी सांगतो की मला लष्करात सेवेची संधी मिळावी, ही इच्छा अपूर्ण आहे.
असे चंद्रकांत पाटील यांनी संगीतले. जेव्हा मी राजकारणातून बाजूला जाईन तेव्हा निश्चितच सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मिळेल ते सेवाकार्य करेन असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
यावेळी उपस्थितांनी प्रदीप ताथवडे व लद्दाख सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रदीप ताथवडे यांची पुतणी प्रांजल ताथवडे यांनी ह्र्द्य मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

