Pune City News
पुणे

पासोड्या विठोबाची दानपेटी फोडली

PUNE CITY NEWS :- पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. सध्या लॉक डाऊनमुळे सर्व मंदिरे नागरिकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवार पेठेत असणाऱ्या पासोड्या विठोबा मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावरून घुसून ही चोरी करण्यात आली आहे.

मंदिराच्या दानपेट्या चोरांनी फोडून त्यातला ऐवज लंपास केला आहे. पुजारी सकाळी पूजा करण्यासाठी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. घटना समजताच पोलीस दाखल झोके असून अधिक तपास सुरू आहे.

Related posts

राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत करावी -महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच

Vishal Khandagale

काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवड

Vishal Khandagale

Leave a Comment