Pune City News
कोरोनापिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील हा परिसर सील

Pune City News :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव या चार भाग सील करण्यात येणार आहेत.

ही अमलबजावणी बुधवारी (.८) रात्री १२ पासून करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

यावेळी हार्डीकर म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूमुळे शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यावर उपाययोजना म्हणून व शहरातील बाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन काही भागात नागरिकांच्या फिरण्यावर मर्यादा आणणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले

घरकुल, चिखली : बिल्डिंग ए-१ ते २०. पवार इंडस्ट्रीयल परिसर, नेवाळे वस्ती.
जामा मशीद, खराळवाडी, पिंपरी : गिरमे हाॅस्पिटल- अग्रसेन लायब्ररी- क्रिष्णा ट्रेडर्स- चैताली पार्क सोसायटी- खराळ आई गार्डन- ओम हाॅस्पिटल- ओरिएंटल बँक- सीटी प्राईड हाॅटेल- क्रीस्टल कोर्ट हाॅटेल.

दिघी : एमव्हीएस, काॅम्प्युटर- सर्वथा गिफ्ट शाॅपी- साई मंदिर- अनुष्का आॅप्टिकल- रोडे हाॅस्पिटल. शिवतीर्थनगर, पडवळनगर,

थेरगाव : शिरोळे क्लिनिक- गणेश मंदिर- निदान क्लिनिक- किर्ती मेडिकल- रेहमानिया मशीद- आॅर्किड हाॅस्पिटल- अशोका सोसायटी या भागांत सील असणार आहे.

बातमी let’s up वरून

Related posts

ताडीवाला रोडला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !

Vishal Khandagale

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) व किरण भालेराव यांच्याकडून अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale

टाळ्या, दिव्यांनी कोरोना पळणार नाही; राहुल गांधी

Vishal Khandagale

Leave a Comment