Pune City News:- दिनांक 19 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणु पासून सुरक्षेसाठी पार्थ पवार फाउंडेशन तर्फे हडपसरमध्ये दहा हजार मास्क वाटप करण्यात आले. त्याच बरोबर पुणे, पनवेल, कर्जत, मावळ, खोपोली, खालापूर, उरण, बारामती अशा ठिकाणी हजारो मास्क वाटप करण्यात आले.जगभरात कोरोना विषाणू थैमान घातलेले आहे. आतापर्यंत कोरोनाचे जगात सहा हजारहून अधिक बळी गेलेले असतानाच कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच देशांत प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा शिरकाव भारतात तसंच महाराष्ट्रात देखील झाला आहे.पुणे जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पुण्यात कोरोनाचे एकूण 18 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील नागरिकांनमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापासून वाचण्यासाठी सरकार व पुणे महापालिकेतर्फे पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.दरम्यान, सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी मॉल, दुकाने, मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच नागरिकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासन करत आहे
previous post

