Pune City News
पिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात लोकसहभागातून उभारणार कोविड सेंटर-आमदार महेश लांडगे

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

त्यात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात आता “लोकसहभागातून” कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत निर्णयाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत बैठकही झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लोकसभागातून राज्यातील पहिला प्रयोग करण्यात येणार आहे. आणि त्याची सुरुवात माझ्या म्हणजे भोसरी विधानसभा मतदार संघातूनच केली जाणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.

तो जवळपास साडेआठ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेड कमी पडू लागले आहेत. तसेच आरोग्य प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला आहे.

याबाबत प्रशासकीय अधिकारी , महापालिका आयुक्त आणि आमदार महेश लांडगे यांच्यात बुधवार( दि.१५) रोजी बैठक पार पडली. त्यानुसार प्रभागानुसार कोविड सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.

Related posts

फडणवीसांनी घेतला कोरोनाच्या स्थितीचा आढावा

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

आकुर्डी भरदिवसा खून!

Vishal Khandagale

Leave a Comment