पिपरी चिंचवडपुणे

स्वच्छ सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट राज्यात अव्वल

PUNE CITY NEWS:-  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तीन वर्षे भाग घेणाऱ्या आणि गतवर्षी देशात 40 व्या स्थानी असलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने यंदा सामूहिक प्रयत्न केले, राज्यात प्रथम तर देशात आठवा पुरस्कार मिळवल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपस्थित : स्वच्छ सर्वेक्षणात कॅंटोन्मेंटला मिळालेल्या पुरस्काराची माहिती देण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, अ‍ॅड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, एम. सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

यंदा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला 6 हजार गुणांपैकी 2942.98 गुण मिळाले आहेत.  राज्यात शेवटच्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने संबंधित यंत्रणेने देशातील ‘फास्टेस्ट मूवर’ कॅंटोन्मेंट बोर्डाचा प्रथम पुरस्कार देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला दिल्याचे सांगितले.

सीईओ हरितवाल म्हणाले : वारंवार संबंधितांच्या बैठका, आरोग्य विभागातील कामाची पद्धत, कचरा व्यवस्थापन, घंटा गाडीद्वारे घरोघरी गोळा केला जाणारा कचरा, सुलभ शौचालय, खत प्रकल्प, उद्यान, जीम व्यवस्था आदीची दखल घेतली.

Related posts

10 वी आणि 12 चा निकाल अद्याप नाही

Vishal Khandagale

शिर्डी साईबाबांचे मंदिर बंद

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX