कोरोनापुणेमहाराष्ट्र

पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे, दि. 7 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार,  हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणिपूर, आसाम,ओरिसा, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख  6 हजार 8  प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून  7 जून  2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्य प्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1,      आसामसाठी 1, ओरिसासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 154  रेल्वेगाड्या 2  लाख  6 हजार 8  प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

(टिप : – दि. 7 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Related posts

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

कोरोना : बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

जम्बो रुग्णालयात डायलिसिस सुविधा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.