पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार सध्या याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी पुणे क्राईम ब्रॅंचच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.

