Pune City News:- पुण्यात आज दुपारच्या सुमारास अवकाळी वाऱ्यासह पावसाने संचेती चौकातील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान कोसळली.

लॉकडाउन असल्यामुळे रहदारी पूर्ण बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही.
तसेच दुसरी घटना सोमवार पेठेतील सदा आनंदनगर परिसरात घडली. एका इमारतीवर असणारा एका कंपनीचा टॉवर भर पावसात कोसळल्याने त्या परिसरात रेंज जाण्याचा प्रकार समोर आला आहे.

याशिवाय शनिवारवाड्याजवळ असणारे जुने झाड या पावसाने रस्त्यावर कोसळले. त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाला होता.
previous post

