गुन्हे विषयकपुणे

पुणे ग्रामीण पोलिसांनी चंदन तस्करांना पकडले…

Pune City News:- पुणे ग्रामीण पोलिसांनी चंदन तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

त्या टोळीकडून सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास शहाजी माने (वय २५, रा.मुर्टी, उंबरवाडा ता.बारामती) राजू बाबू शिंदे (वय ३० वर्षे रा.दापोडी, वैदवाडी ता.दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र चंदन खरेदी करणारा रमेश करडे हा पसार झाला आहे.

वरिष्ठ निरीक्षक घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश गायकवाड कर्मचारी निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथकाने येथे देशमुख वस्तीजवळ सापळा रचून या चोरट्याना पकडले आहे.

दुचाकी, मोबाईल २२ किलो चंदनाचे झाडाचे लाकडे व इतर असा एकूण २ लाख २० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Related posts

आळंदी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर !

Vishal Khandagale

आयुक्तांच पुणेकरांना आवाहन

Vishal Khandagale

नगर रस्त्यावरील भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा: अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX