Pune City News:- अमित शाह यांनी लॉकडानच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी 15 दिवसांनी वाढवण्याची मागणी केल्याने 1 जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या व्यवहारांना मुभा? : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील विविध आर्थिक व्यवहारांना परवानगी दिली. टाळेबंदीच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात कोणत्या व्यवहारांना मुभा द्यायची यावर केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. देशात 24 मार्च, 15 एप्रिल, 3 मे आणि 17 मे असा चार वेळा लॉकडाउन जाहीर झाला आहे.



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेतली. महाराष्ट्राने जूनमध्येही टाळेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटक सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली असली तरी, अन्य राज्यांतील प्रवाशांना येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाने दिल्लीची सीमा बंद केली आहे.

